Breaking News

जि. प. सभेत दूषित पाणी पेटले

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेची गुरुवारी (दि. 22) झालेली सर्वसाधारण सभा दूषित पाणीप्रश्नावरून गाजली. उमटे धरणातून गावागावांत वितरित होणार्‍या दूषित पाण्याच्या बाटल्या सभागृहात आणल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.   गणेशोत्सवापूर्वी जलशुध्दिकरण प्रकल्प कार्यान्वित करून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत अध्यक्षा आदिती तटकरे यांनी वेळ मारून नेली. नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांचा आणि त्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दाही या वेळी चर्चेत आला.

 जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी आदिती तटकरे होत्या. या वेळी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी गेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. आयत्या वेळच्या विषयात चर्चा करताना विऱोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी जिल्हा परिषदेच्या उमटे धरणातून ग्रामस्थांना होणार्‍या दूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दूषित पाण्याच्या बाटल्यांचे नमुनेच सभागृहासमोर सादर केले. यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. गेले अनेक दिवस धरणातून 64 गावांना असेच गढूळ पाणी प्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धरणावर जलशुध्दिकरण प्रकल्पासाठी एक कोटी 32 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे, मात्र तरीही ग्रामस्थांना मातकट पाणी पिण्याची वेळ आल्याचे म्हात्रे यांनी या वेळी सांगितले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply