Breaking News

फडके विद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त

गेल्या अनेक दशकांपासून मुलांवर चांगले संस्कार व शिक्षण क्षेत्रात रायगड जिल्ह्यात अग्रेसर असलेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल येथे नुकतेच व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर कार्यशाळा मोठ्या उत्साहात झाली. व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे मार्गदर्शक बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक अरविंद मोरे उपस्थित होते. या वेळी अरविंद मोरे यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक घटक, बाधा आणणारे घटक व करिअर मार्गदर्शन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या शंकांचे निराकरण केले. या वेळी दहावीनंतर रोजगाराच्या विविध वाटा व बँक ऑफ महाराष्ट्राच्या रोजगाराच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन, सुनीता वाघ उपस्थित होत्या. कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री. मोरे यांचा परिचय व स्वागत शाळेच्या अधीक्षक समिता सोमण यांनी केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार प्रीती धोपाटे यांनी केले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply