Breaking News

पनवेल मनपा हद्दीत हायमास्टचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

महापालिका हद्दीतील पापडीचा पाडा, रोहिंजण, खुटारी, पेठ, पिसार्वे या गावांमध्ये महापालिकेमार्फत हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. या कामांचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 10) भूमिपूजन करण्यात आले, तसेच या वेळी त्यांनी परिसरात ठिकठिकाणीच्या गणरायांचे मनोभावे दर्शनही घेतले.

या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, तळोजा शहराध्यक्ष निर्दोष केणी, ओवे शहराध्यक्ष सचिन वास्कर, ओवे वनरक्षक समिती अध्यक्ष प्रभाकर जोशी, तळोजा कारागृह समिती सदस्य जयदास तेलवणे, माजी उपसरपंच साजिद पटेल, रामचंद्र जाधव, युवा नेते विनोद घरत यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply