पनवेल ः राप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे एम. एन. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेमध्ये 12 सुवर्णपदक तसेच पाच रजत पदक संपादन करून घावघवीत यश मिळवले. यामध्ये 14 वर्षे वयोगटातील दीप संजय धांगडे, हर्ष अनिल गजघटे, तन्मय महेश नाईक, आश्रीवत अमर खोत यांनी सुवर्णपदक तर हिमेश महेश घरत याने रजत पदक पटकावले. तसेच 17 वर्षांखालील वयोगटामध्ये शुभम राजेंद्र मुंबईकर (रजत पदक), आयुष अमर म्हात्रे, यश संजय धांगडे, श्रीकृष्ण सुहास पाटील, स्वराज महादेव ढोकरे, लकी संजय घरत, मानव चंद्रशेखर पाटील (रजत पदक) यांनी सुवर्णपदक पटकावले. तसेच 17 वर्षांखालील मुलींच्या वयोगटामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक तसेच रजत पदक पटकावले. यामध्ये प्रिया रामप्यारे राजभर, कस्तुरी संदीप कोळी, पायल प्रभाकर गोंधळी, प्राजक्ता लक्ष्मण जोगळेकर (रजत), रोशनी शाह यांनी यश संपादन केले. संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले आहे.