मोहोपाडा ः वार्ताहरश्री समर्थ सामाजिक संस्था रसायनी व लोना इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोपाडा वावेघर झोपडपट्टी येथे आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एमजीएम हॉस्पिटल कामोठेतर्फे स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, सर्जन, नेत्ररोग अशा तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. त्याचप्रमाणे ब्लड ग्रुप, सीबीसी, थाइरॉइड अशा रक्त तपासण्याही करण्यात आल्या. या शिबिराचा 98 रुग्णांनी लाभ घेतला. संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील गेली अनेक वर्षे या शिबिरांचे आयोजन करत आहेत. या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे उपसरपंच, लोना कंपनीचे अधिकारी, भीम भंडारी, काशीनाथ खुडे, एमजीएम हॉस्पिटलचे जावेद व डॉक्टरांचे पथक उपस्थित होते. या शिबिरात नागरिकांनी आरोग्यविषयक विविध तपासण्या करून रोगाचे निदान जाणून घेतले.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper