Breaking News

बेलवलीतील विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत बेलवली येथे स्थानिक आमदार विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ पाटील यांच्या हस्ते आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाले.

या अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनावेळी माजी सरपंच भरत पाटील, सरपंच बबन पवार, भाजपचे गावकमिटी सरचिटणीस रामदास ढोपरे, अध्यक्ष संतोष पाटील, माजी सरपंच भरत पाटील, संतोष तुकाराम पाटील, महेश पाटील, संतोष हिरामण पाटील अनंता पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.या वेळी पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील आणि सरपंच बबन पवार यांनी या कामासंदर्भात अधिक माहिती दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply