Breaking News

कळंबोलीतील कॅप्टन बारवर पोलिसांचा पुन्हा छापा; चार बारबालांसह 57 जण ताब्यात

पनवेल : बातमीदार  

कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कॅप्टन बारवर पोलिसांनी रविवारी (दि. 22) मध्यरात्री छापा मारून चार बारबालांसह मालक, व्यवस्थापक, वेटर आणि ग्राहक अशा एकूण 57 जणांना ताब्यात घेतले आहे.

कळंबोली पोलिसांनी मध्यरात्री 2:15 वाजता ही कारवाई करण्यात आली. टाकण्यात आलेल्या या धाडीत मालक, व्यवस्थापक, कॅशियर, दोन वेटर आणि चार नृत्यांगना असे 10 जण, तर 47 ग्राहकांना बीभत्स हावभाव करीत असताना, तसेच बारबालांना आकर्षित करताना आढळून आले. या वेळी बारबालांकडून बीभत्स वर्तन करून घेण्यास हॉटेलच्या स्टाफने मदत केली, तसेच विहित वेळेचे बंधन झुडकारल्यामुळे अटी व शर्तींचा भंग केल्याने भा.दं.वि.कलम 294, 114, 34 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 (डब्ल्यू) 131, महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह प्रश्न, मद्यप्राशन अश्लील महिलांचा नृत्यकायदा अधिनियम 2016चा 3, 8 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वेळी 10 हजार 860 रुपये रोख रक्कम, तसेच म्युजिक सिस्टम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, रविवारी 57 जणांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांची मुक्तता केली. याबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक धैर्यशील घाटगे करीत आहेत.  कॅप्टन बारवर कारवाईस टाळाटाळ करण्याचा ठपका ठेवून कळंबोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांना पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी निलंबित केले होते.

यापूर्वी 13 नोव्हेंबर 2018 रोजी वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या पथकाने 23 बारबाला, चार गायिका आणि

बार व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला होता. या बारमध्ये मारामारी -हाणामारीसारखे प्रकार घडले असल्यामुळे वादग्रस्त कॅप्टन बार म्हणून त्याची ओळख झाली होती.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply