माणगांव : प्रतिनिधी
शहरातील महाराणा प्रताप नगरात मंगळवारी (दि. 11) दुपारी जोरदार हाणामारी झाली. त्यात एका अल्पवयीन मुलासह एक महिला जखमी झाली. या प्रकरणी सहा जणांवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सरिता चव्हाण या पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या.त्यावेळी त्यांच्या दिराचा मुलगा रोहन राजू चव्हाण अंथरुणावर झोपला होता. त्यावेळी शेजारी राहणारे महेंद्र हनुमंत मोहिते, सचिन भानुदास चव्हाण, गितेश भानुदास चव्हाण, सुलोचना भानुदास चव्हाण, सारिका महेंद्र मोहिते, भानुदास काळू चव्हाण (सर्व रा. महाराणा प्रताप नगर ता. माणगांव) यांनी सरिता चव्हाण यांच्या घरात घुसून रोहन यास मारहाण केली. सदरचे भांडण सोडविण्यास गेलेल्या शालिनी चव्हाण यांनाही मारहाण केली. या घटनेत रोहन चव्हाण (वय 16) व शालिनी चव्हाण (वय 65) जखमी झाले. या प्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक सुनिल शिरसाट करीत आहेत