

नागोठणे : प्रतिनिधी
माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे खंदे समर्थक मारुती देवरे यांची भारतीय जनता पक्षाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नागोठणेसह संपूर्ण पेण विधानसभा मतदारसंघात समाधान व्यक्त केले जात असून सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर तसेच रविशेठ पाटील यांचे हात निश्चितच आणखी बळकट होतील, अशी भावना व्यक्त केली जात आहे. एका छोटेखानी समारंभात नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, प्रियदर्शनी सहकारी वाहतूक संस्थेचे माजी अध्यक्ष सिराज पानसरे, कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते खंडूशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा रविशेठ पाटील यांचे खंदे समर्थक सुभाष पाटील, भाजपच्या नागोठणे पंचायत समिती गणाचे अध्यक्ष तथा ऐनघर ग्रामपंचायत सदस्य संतोष लाड, पिगोंडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेंद्र लवटे यांच्या हस्ते मारुती देवरे यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उमेश परब व गणेश परब यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper