Breaking News

आदर्श आचारसंहितेबाबत बैठक

पनवेल ः बातमीदार

पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता राबविण्यासाठी विविध राजकीय पदाधिकार्‍यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काळसेकर कॉलेज येथे माहिती देण्यात आली. या वेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे, उप विभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, पनवेल तहसीलदार अमित सानप, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सर्व वपोनि, गोपनीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी, तसेच सर्व राजकीय पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांनी माहिती देताना सांगितले की, निवडणुकीबाबत 27 सप्टेंबर रोजी नोटिफिकेशन जाहीर होणार असून 4 ऑक्टोबर रोजी

नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख असणार आहे. या वेळी 5 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. पनवेल विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये एकूण पाच लाख 54 हजार 464 मतदार आहेत. यामध्ये दोन लाख 97 हजार 272 पुरुष मतदार, तर दोन लाख 57 हजार 374 महिला मतदार आहेत. या मतदार क्षेत्रामध्ये 576 मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर घेण्याचे ठरले आहे. सर्वात अधिक मतदार खारघर केंद्रावर, तर सर्वात कमी मतदार हे खैरवाडी केंद्रात आहेत. या वेळी चार पथके तैनात करण्यात आली आहेत. या वेळी असणार्‍या अटींमध्ये उमेदवारांनी सफेद बॅकग्राऊंड असलेला नव्याने काढलेला फोटो बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच उमेदवारांनी केलेला खर्च याची पडताळणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांमार्फत केली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी आपला खर्च करताना कराळजी घ्यावयाची आहे. या वेळी पेड न्यूजबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले. पोलीस उपायुक्तांनी पनवेल विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे होण्यासाठी सर्वांनीच काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply