Breaking News

शाश्वत फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस

पनवेल : रामप्रहर वृत्त

28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.शाश्वत फाऊंडेशनतर्फे अ‍ॅड. सेन्टर सायन्स अ‍ॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून खारघर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत ‘हसत खेळत विज्ञान शिका’ ह्या संकल्पनेतून विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

21व्या शतकात राष्ट्रीय पातळीवर भारताने गरूडझेप घेतली असून त्यात आपल्या देशाने प्राप्त केलेल्या वैज्ञानिक सिद्धींचा मोलाचा वाटा आहे. भविष्यातही भारताला जर महासत्ता बनून विश्वपातळीवर अमेरीका, जपान, रशियासारख्या देशांना टक्कर द्यायची असेल, तर आपला आजचा विद्यार्थी हा विज्ञान ह्या विषयात तल्लख बुद्धीचा असणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय सोपा आणि आवडीचा वाटणे गरजेचे आहे. याच हेतूने शाश्वत फाऊंडेशनच्या अध्यक्षा बीना गोगरी यांनी खारघर येथे या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. शाळेतील इ. 7 वी व 8 वीच्या 85 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या मनात आजूबाजूला घडणार्‍या नैसर्गिक व रासायनिक प्रक्रियेबद्दल उत्सुकता निर्माण होऊन त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळावी व त्यांची निरीक्षणशक्ती तीव्र व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सौ. गोगरी यांनी सांगितले. या वेळी महिला आणि बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेवक प्रवीण पाटील, पनवेल मनपा खारघर वॉर्ड अधिकारी भगवान पाटील, भाजप खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती आर. के. दिवाकर, अल्पना डे, फाऊंडेशनच्या सचिव अंजू पटेल, गीता पटेल, श्री. घुघे सर व शाळेचे शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यशाळेत प्रकाश नवले सर, जुईली लाड, तृप्ती अडांगळे व प्रलय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविली व त्यांच्या शंकांचे निवारण करून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती श्री आर. के. दिवाकर यांचे सहकार्य लाभले.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply