Breaking News

भाजपच्या नवीन पनवेलमधील प्रचाराचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सोमवारी नवीन पनवेल येथे माजी खासदार लोकनेत रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली. आमदार प्रशांत ठाकूर यांना दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांचे पारडे अधिकजड झाले आहे. या प्रचाराच्या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, सुशीला घरत, भाजप नेते संदीप पाटील, सुनील घरत, जगदीश घरत, काका भगत, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, प्रशांत फुलपगार, रवी नाईक, जितेंद्र वाघमारे, अनंत जाधव, माजी नगरसेविका वर्षा नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply