Breaking News

पद्मजा जोशी यांची मैफल रंगली

पनवेल ः रामप्रहर वृत्त

आदर्श महिला मंडळात अध्यक्षा शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रौत्सव रविवारी साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने गायिका पद्मजा जोशी आणि सहकारी यांच्या संगीतमय गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी आदर्श महिला मंडळाच्या छाया म्हात्रे, प्रतिभा दळवी, जयाबेन सोमैया, सुमेधा गुरुजी, रूपा कांडपिळे, अश्विनी खेडकर, अलका जैतपाल, रेखा जोशी, हेमलता जैतपाल यांच्यासह मिडल क्लास हौसिंग सोसायटीतल्या सर्व सभासद भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी गायिका पद्मजा जोशी यांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला.

Check Also

टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …

Leave a Reply