पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात नुकतीच गांधी जयंतीनिमित्त सौरऊर्जा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबईचे उपप्राचार्य डॉ. नंदकिशोर चंदन यांच्या हस्ते झाले. त्यांनीही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यास शुभेच्छा दिल्या, तसेच हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केलेे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. नीलेश वडनेरे आणि भौतिकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. गौरी पाटील हे या कार्यशाळेचे समन्वयक होते. प्रा. डॉ. सुधाकर यादव, प्रा. रमाकांत नवघरे, प्रा. गणेश साठे, प्रा. राजेश सगळगीले, प्रा. निलिमा तिदार, प्रा. सत्यजित कांबळे आणि प्रा. प्रथमेश ठाकूर या सात प्राध्यापकांनी या कार्यशाळेचे आय.आय.टी. मुंबई यांच्यातर्फे ऑनलाइन प्रशिक्षण घेतले होते. या कार्यशाळेमध्ये 175 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी लागणारे 175 सोलार असेम्बली संच सायरस सोलार, हैद्राबाद येथून मागवण्यात आले होते. सकाळी 10 ते 11च्या सत्रामध्ये डॉ. सुधाकर यादव, प्रा. रमाकांत नवघरे, प्रा. गणेश साठे, प्रा. राजेश सगळगीले यांनी सौरऊर्जा ही पुनर्निर्माणक्षम असल्याचे महत्त्व पटवून दिले, तसेच सकाळी 11 ते दुपारी 1च्या सत्रामध्ये प्रा. सत्यजित कांबळे आणि प्रा. प्रथमेश ठाकूर यांनी सौरकीटच्या घटकांची माहिती दिली, तसेच दुपारी 2 ते संध्याकाळी 6च्या सत्रामध्ये सौरकीटच्या घटकांचे संयोजन सवर्र् प्रशिक्षित प्राध्यापकांतर्फे दाखवण्यात आले. हा उपक्रम यशस्वीरीत्या आयोजित केल्याबद्दल माजी खासदार व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सिडकोचे अध्यक्ष व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे व उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी कौतुक केलेे.