खारघर ः भाजपचे युवा कार्यकर्ते करण म्हात्रे यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी करण म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी खारघर प्रसिद्धीप्रमुख गुरुनाथ म्हात्रे, रामनाथ मुकादम, सुरज पाटील, अजित भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसचे कार्यकर्ते क्वाईस जुबेर पटेल यांचा भाजपत प्रवेश
पनवेल : ज्येष्ठ समाजसेवक जुबेर पटेल यांचे सुपुत्र व काँग्रेसचे कार्यकर्ते क्वाईस जुबेर पटेल यांनी भाजपत प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भीमसेन माळी, मुकीत काझी, मनोहर म्हात्रे, हेमलता म्हात्रे, इम्तियाज बागी, जावेद काझी, अब्दुल काझी, शावेज रिझवी, निसार सय्यद आदी उपस्थित होते.