उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील पिरकोन येथील असंख्य कार्यकर्त्यांनी दसर्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरणच्या नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, शहर अध्यक्ष कौशिक शहा, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष शहनाज मुकादम, सरचिटणीस रेय्यान तुंगेकर, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, पंडित घरत, सरचिटणीस सुनील पाटील, वाहतूक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोईर, महालण विभाग भाजप अध्यक्ष महेश कडू, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर तांडेल, चिटणीस मुकेश म्हात्रे, मनन पटेल आदी उपस्थित होते. या वेळी प्रणील गावंड, रमेश गावंड, नितेश ठाकूर, विष्णू म्हात्रे, साक्षर गावंड, अनिल मोकल, विकास पाटील, दीपक पाटील, अमित गावंड, संदेश गावंड, आदेश मोकल, जितेश गावंड, नरेश गावंड, विराज गावंड आदी कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. भाजप गाव अध्यक्ष मुकुंद गावंड, डी. बी. गावंड, बाळकृष्ण पाटील, प्रभाकर गावंड, प्रमोद सर, जितेंद्र गावंड, राजेश जोशी, बळीराम पाटील, मंगेश गावंड, रुद्राक्ष गावंड, रवी गावंड, संदीप गावंड, नरेंद्र गावंड, विकी गावंड यांच्या उपस्थितीत अनेकांनी भाजपत प्रवेश केला.