
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रा.स्व. संघ व जनहित संवर्धक मंडळ, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ऑक्टोबर रोजी वनवासींच्या सोबत एकत्र फराळ कार्यक्रम घेण्यात आला. पनवेल शहरातील तरुणाई व संघ कार्यकर्ते असे अंदाजे 79 जण आपल्याला घरातून फराळ घेऊन वेगवेगळ्या 5 वनवासी पाड्यांवर पोहोचले (भल्याची वाडी, बेलवाडी, आवळीचा मळा, फणसवाडी, करंबेळी) येथील अंदाजे 300 वनवासी बंधू भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथे जाऊन पाड्यावरील वनवासी बांधवांशी गप्पागोष्टी करत फराळाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पाड्यावरील महिला व लहान मुलांचा विशेष सहभाग होता. फराळाबरोबर सर्वांनी सामूहिक गीताचा आनंद घेतला. काही वनवासीपाड्यावर सर्पांबद्दल माहिती देण्यात आली. करंबेळी येथील श्री. चांगु चौधरी यांचा याकार्यक्रमात मोठा हातभार लागला.
RamPrahar – The Panvel Daily Paper