समस्या सोडविण्याच्या अधिकार्यांना सूचना
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे यांनी शहरातील नवनाथनगर व मालधक्का झोपडपट्टी येथील समस्यांची पाहणी करून अधिकार्यांना कामे करवून घेण्याच्या सूचना केल्या.
पनवेलमधील नवनाथनगर झोपडपट्टी व मालधक्का झोपडपट्टी या ठिकाणी गटारांची व शौचालयाची दुरवस्था झाली असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे नवनाथनगर व मालधक्का परिसरातील समस्यांची पाहणी केली. यानंतर त्यांनी गटारांची सफाई व दुरुस्ती तसेच शौचालयाची सफाई व दुरुस्ती करणे, नूतनीकरण करण्याच्या पनवेल महापालिकेच्या अधिकार्यांना सूचना केल्या.
या वेळी अॅड. वृषाली वाघमारे यांच्या समवेत वॉर्ड अधिकारी अमर पाटील, एसआय अभिजित गोवर, बांधकाम विभाग इंजिनिअर आकाश गायकवाड, आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.