Breaking News

कर्जमंजुरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

पनवेल : बातमीदार

बिल्डिंग बांधकामाकरिता 100 कोटींचे कर्ज मंजुर करून देतो, असे सांगून पुणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल 31 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यातील दोन आरोपींवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश नानकचंद आग्रवाल यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून त्यांची पुणे येथे आग्रवाल इंटरप्राइजेस व नरेश बिल्डकन प्रा.लि. या नावे असलेले दोन बिल्डिंग बांधकाम व्यवसायाची कंपनी आहे. त्यांची सुरज या इसमाने पर्याय फायनान्सचे मालक मिलिंद सदाशिव लवाटे (रा. कांदिवली, मुंबई) यांच्याशी ओळख करून दिली होती. नंतर लवाटे यांनी आग्रवाल याना शंभर कोटी रुपयांचे लोन करून देण्यासाठी 10 लाखांची मागणी केली. दोन महिन्यानंतर आणखी 15 लाखांची रक्कम लागणार असल्याचे लवाटे यांनी कळविले. त्यानंतर लोनच्या प्रोसिजरकरिता सहा लाख रुपये रोख थ्रीस्टार हॉटेल येथे येऊन अग्रवाल यांनी दिले. या वेळी विश्वास बसावा म्हणून मिलिंद लवाटे यांनी अग्रवाल याना 25 लाखांचा चेक सिक्युरिटी म्हणून दिला होता. त्यानंतर अग्रवाल यांनी वारंवार मिलिंद लवाटे, तसेच सुरज ऊर्फ पंकज सिंग यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क झालेला नाही. त्यामुळे अग्रवाल यांची 31 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात मिलिंद लवाटे व त्याचा साथीदार सुरज ऊर्फ पंकज सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply