Breaking News

पालिका अतिक्रमण विभाग पथकाची धडक कारवाई

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकाने आज पनवेल परिसरात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण शुल्क वसूल केले आहे.

खांदा वसाहत परिसरात दीपावलीच्या सुटीमुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व अवैध विक्रेते वाढले होते. याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकाचे प्रभारी अधिकारी श्रीराम हजारे व दशरथ भंडारी यांच्यासह पथकाने त्या परिसरात जाऊन बेकायदेशीर अतिक्रमणे व अवैध विक्रेते यांच्या विरोधात धडक कारवाई करीत अतिक्रमण शुल्क 35,500 रोख व 2000 चेकने वसूल केले. यापुढेही अशा प्रकारे धडक कारवाई पनवेल परिसरात सुरू राहणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply