Breaking News

एकाच डावात घेतले 10 बळी

तेजपूर : वृत्तसंस्था

मेघालयचा फिरकीपटू निर्देश बैसोयाने स्थानिक क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. 16 वर्षाखालील विजय मर्चंट चषक स्पर्धेत खेळत असताना नागालँड संघाविरोधात निर्देशने

एकाच डावात 10 बळी घेतले आहे. 15 वर्षीय निर्देश हा मूळचा मेरठचा असून, काही वर्षांपूर्वी त्याने मेघालयकडून खेळण्यास सुरुवात केली आहे.

निर्देशने नागालँडविरुद्ध सामन्यात पहिल्या डावात 21 षटके टाकून 51 धावा देत 10 बळी घेतले. निर्देशने 21 पैकी 10 षटके निर्धाव टाकली होती. निर्देशच्या कामगिरीमुळे नागालँडचा संघ पहिल्या डावात 113 धावांवर गारद झाला. यानंतर पहिल्या दिवसाअखेरीस प्रत्युत्तरादाखल मेघालयने चार गड्यांच्या मोबदल्यात 109 धावांपर्यंत मजल मारली.

एकाच डावात 10 बळी घेणे ही कोणत्याही गोलंदाजासाठी मोठी गोष्ट मानली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांनाच कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करता आलेली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये देबाशिष मोहंती, सुभाष गुप्ते, प्रदीम सुंदरम आणि पी. एम. चॅटर्जी यांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे, तर मणिपूरच्या रक्स सिंहने 19 वर्षाखालील कूच बिहार करंडक स्पर्धेत 10 बळी टिपले होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply