Breaking News

निवडणुकीनंतरही भाजपमध्ये इनकमिंग; वाकडीतील शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणुकीनंतरही भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यार्‍यांचा ओघ कायम असून, पनवेल तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी (दि. 9)

भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख, उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तसेच शरद खारकर, शशिकांत शेळके, सरपंच नरेश पाटील, कचेर पाटील, उपसरपंच विनोद भोपी, माजी सरपंच नामदेव जमदाडे, सदस्य भानूदास खुटले, मेघनाथ पाटील, विलास चोरघे, वाकडी अध्यक्ष संतोष पाटील, अ‍ॅड. अरुण पाटील, सरचिटणीस पद्माकर म्हसकर, गणेश पाटील, यशवंत खुटले, हिरामण पाटील, जयदास पाटील, कुंदा पवार, इसाक शेख, गणेश खुटले, जनार्दन पाटील आदी उपस्थित होेते.

या वेळी वाकडी येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य बबन वाग, माजी उपसरपंच लहू वाघ, विद्यमान सदस्य लक्ष्मी वाघ, प्रकाश वाघ, शिवराम वाघ, कान्हा वाघ, दत्तू वाघ, बळीराम वाघ, पप्पू वाघ, लखते वाघ, विकास सवार, यशवंत वाघ, रामदास वाघ, साखरू पवार, अनसूया वाघ, गिरा वाघ, गणपत वाघ, आनंदी वाघ, अनसूया शिवराम वाघ, जनाबाई वाघ, रंजना वाघ, लहू वाघ, पुष्पी वाघ, दीपक वाघ, शिवा वाघ यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply