Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे गोळाफेक, थाळीफेकमध्ये यश

हर्षल शर्माची दुहेरी कामगिरी

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)चा विद्यार्थी हर्षल हेमंत शर्मा (इयत्ता आठवी) याने गोळाफेक आणि थाळीफेक स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.

सीबीएसई बोर्डाची राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा नुकतीच कोल्हापूर येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल येथे झाली. या स्पर्धेत ‘आरटीपीएस’चा विद्यार्थी हर्षल शर्मा याने गोळाफेक या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला, तर मुंबई येथे झालेल्या विभागस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत थाळीफेक या क्रीडा प्रकारात त्याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्यामुळे त्याची राज्य स्तरावर निवड करण्यात आली आहे.

संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी यशस्वी खेळाडू हर्षल शर्मा, तसेच त्याला मार्गदर्शन करणारे मंदार मुंबईकर यांचे कौतुक करून अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Check Also

हंगामा हो गया…बिंदू ८५ वर्षांची झाली

सत्तरच्या दशकात मी शाळेत असतानाचा विनोद ( आता त्यावर हसता येणार नाही. वेगळ्या अर्थाने हसाल …

Leave a Reply