
अलिबाग ः प्रतिनिधी
लायन्स क्लब पोयनाडच्या वतीने 20 गरजू, गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. हे सायकल वाटप जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, साहित्यिक-संपादक उमाजी केळुसकर, लायन्स क्लबचे झोन चेअरमन प्रदीप सिनकर, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष मनीष अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
लायन्स क्लब पोयनाड तळागाळातील लोकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित आला आहे. परिसरातील शालेय, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेत जाताना 2 ते 7 किलोमीटर पायपीट करावी लागते. ही त्यांची पायपीट टळावी व त्यांचा उर्वरित वेळ अभ्यासाला मिळावा या हेतूने लायन्स क्लब पोयनाडने गरजू-गरीब विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटपाचा उपक्रम शनिवारी लायन्स सदस्य विनोद पाटील यांच्या पोयनाड येथील इमारतीतील सभागृहात राबविला. या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, साहित्यिक-संपादक उमाजी केळुसकर, लायन्स क्लबचे झोन चेअरमन प्रदीप सिनकर, डी. सी. धवल राऊत यांच्यासह लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष मनीष अग्रवाल, उपाध्यक्ष मनोहर चवरकर, सचिव विकास पाटील, खजिनदार प्रमोद पाटील, ला. अरविंद अग्रवाल, ला. दिलीप गाटे, ला. प्रगती सिनकर, ला. संजय जोशी, ला. विनोद पाटील, कौस्तुभ जोशी, संपर्क बालग्रामचे सतीश चाबूकस्वार, लायन्स क्लब अलिबागचे नयन कवळे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी प्रमुख पाहुणे व लायन्स पदाधिकारी, सदस्य यांच्या हस्ते 20 गरजू, गरीब विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper