Breaking News

संसदेचे आजपासून अधिवेशन; शिवसेना ’एनडीए’तून बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संसदेचे अधिवेशन सोमवारपासून

(दि. 18) सुरू होत आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भाजपसोबत काडीमोड घेतलेली शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत. ते विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी

(दि. 17) दिली. मोदी मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री असलेले अरविंद सावंत यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ते एकप्रकारे एनडीएतून बाहेरच पडले आहेत. साहजिकच त्यांना लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षांच्या बाकावर बसवले जाईल, असे ते म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली. सूत्रांनुसार शिवसेनेच्या राज्यसभेतील  सदस्यांना विरोधी पक्षांची आसने देण्यात आली आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply