Breaking News

राजेश्वरी कुमारीचा नेमबाजीत राष्ट्रीय विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंजाबच्या राजेश्वरी कुमारी हिने 63व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात राष्ट्रीय विक्रम नोंदविला. भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने त्यावर मोहोर उमटवली आहे.

पात्रता फेरीत राजेश्वरीने 125 पैकी 118 गुणांची कमाई केली होती. तिचा हा विक्रम सीमा तोमर, श्रेयसी सिंग आणि मनीषा कीर यांनी संयुक्तपणे नोंदवलेल्या विक्रमापेक्षा दोन गुणांनी सरस ठरला. सीमा, श्रेयसी आणि मनीषा यांनी 2018मध्ये प्रत्येकी 116 गुण मिळवले होते.

Check Also

अनुसूचित जमातीच्या विशेष पदभरतीचा प्रश्न विधिमंडळात!

प्रलंबित भरती तातडीने पूर्ण करण्याची आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी मुंबई …

Leave a Reply