Breaking News

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड

पनवेल : बातमीदार

तळोजातील एका 10 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला तळोजा पोलिसांनी गजाआड केले आहे. इम्तियाज आलमगीर कुवारी (वय 59) असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला 28 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तळोजा फेज-1 येथील भूमी ठाकूर या 10 वर्षीय मुलीला आरोपी स्कूटीवरून पळवून नेण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु तेथे उपस्थित असलेल्या काही युवकांना हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग केला. आपला पाठलाग केला जात असल्याचे लक्षात आल्यावर आरोपीने मुलीला सोडून दिले आणि तो पळून गेला. अपहरणाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले होते.

यासंदर्भात मुलीच्या पालकांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अगदी काही तासांतच सोमवारी रात्री 9च्या सुमारास पोलिसांनी आरोपीला अटक केली. दरम्यान, पकडलेला आरोपी तळोजात राहत असला तरी येथील कायमस्वरूपी रहिवासी नसून कल्याण येथील मूळ रहिवासी आहे, असे तळोजा येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply