Breaking News

श्रीकांत, साईप्रणीत, प्रणॉयची विजयी सलामी

सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा

लखनऊ : वृत्तसंस्था

किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली आहे.

तिसर्‍या मानांकित श्रीकांतने 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात रशियाच्या व्लादिमिर माल्कोव्हचा 21-12, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. कश्यपला फ्रान्सच्या लुकास कॉर्वीविरुद्धच्या लढतीत पुढे चाल मिळाली.

चौथ्या मानांकित साईप्रणीतने मलेशियाच्या इस्कांदर झुल्करनैनचा 21-16, 22-20 असा पराभव केला, तर बिगरमानांकित प्रणॉयने चीनच्या लि शिया फेंगचा संघर्षपूर्ण लढतीत 18-21, 22-20, 21-13 असा पाडाव केला.

गेल्या आठवड्यात स्कॉटिश खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकणार्‍या 18 वर्षीय लक्ष्य सेनलाही पुढे चाल मिळाली. त्याचा प्रतिस्पर्धी फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलने स्पर्धेतून माघार घेतली. महिलांमध्ये अश्मिता छलिहाने वृषाली गुम्माडीचा 32 मिनिटांत 21-16, 21-16 असा पराभव केला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply