Breaking News

पंकजा मुंडे भाजपची साथ सोडणार नाहीत

मुंबई : प्रतिनिधी

पंकजा मुंडे या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करीत त्या मंत्रिपदापर्यंत पोहचल्या आहेत. भाजपच्या नेत्यांचे त्यांच्याशी बोलणे झाले असून, त्या भाजपची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणार्‍या अफवा थांबायला हव्यात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

कोणताही राजकीय नेता पराभवानंतर आपल्या पराभवाचे विश्लेषण करीत असतो. असे का झाले याबद्दल तो आत्मचिंतन करतो. 12 तारखेला गोपीनाथ गडावर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. यासाठी राज्यभरातील त्यांचे अनेक समर्थक गोपीनाथ गडावर येतात. आम्हीही या कार्यक्रमाला जातो. त्यामुळे पंकजा वेगळा विचार करीत आहेत असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply