मुंबई : राज्याचे माजी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना भाजपने क्लीन चिट दिलेली नाही. ज्या केसेस मागे घेतल्या त्याचा अजित पवारांशी संबंध नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे, तसेच अजित पवार दोषी असल्याचा आरोप असलेल्या कुठल्याही फाइल्स भाजपने क्लियर केलेल्या नाहीत. नव्या सरकारने तसे केलेय का माहिती नाही, असेही पाटील म्हणाले. त्यामुळे अजित पवारांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. भाजपच्या मुंबई विभागाची बैठक रविवारी
(दि. 8) झाली. त्यानंतर पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनीही अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणात क्लीन चिट देण्यात आलेली नसून त्यांची अनेक प्रकरणांत चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे.