Breaking News

काँग्रेसचे हमाल दे धमाल!

भाजप नेते आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. या मतदानावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. यावरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी रोज नवे यू टर्न…सत्तेसाठी पाहा कशी कमाल…काँग्रेसचे हमाल दे धमाल! असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

देशातील तमाम हिंदूंसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. त्यांची सेना आज या देशात येणारे आणि येथे आलेल्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते, असे या ट्विटच्या सुरुवातीला शेलार यांनी म्हटले आहे, तसेच दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले. भाजपमुळे जगभरातील हिंदूंना भारत हे आश्रयस्थान झाले आहे. काहींचा विरोध होता. काही जण विरोधी मतदान करून सभागृहात बसले. काही जण ‘जनपथ’ला घाबरून सभागृहातून पळाले…? आणि फसले, असेही शेलारांनी यात नमूद केले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply