Breaking News

ताटात मटण कमी दिल्याने पत्नीला जाळले

पनवेल ः बातमीदार 

जेवणाच्या ताटात मटण कमी वाढल्याच्या कारणावरून पत्नीला जाळल्याची घटना कामोठ्याजवळील जुईगावात घडल्याचे बुधवारी उघड झाले. या घटनेनंतर पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

4 डिसेंबरला आरोपी पतीने रात्रीच्या जेवणात मटणाचा बेत आखला होता. यासाठी त्याने पत्नीकडे जेवणासाठीचे सर्व साहित्य आणून दिले. कुटुंबीयांसमवेत जेवताना ताटात मटणाच्या फोडी कमी असल्याचा राग मनात धरून मद्यपान केलेल्या पतीने पत्नीवर रॉकेल ओतून तिला जाळले. यात ती गंभीररीत्या भाजली. मुलांच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडल्याने मुले हादरून गेली. त्यानंतर आरोपीने होरपळलेल्या अवस्थेतील पत्नीला डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती खालावल्याने तिला मुंबई पालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला.

-मृत्यूच्या काही तास आधी जबानी

भाजलेल्या महिलेने स्टोव्हच्या भडक्याने ही घटना घडल्याचे जबानीत सांगितले होते, मात्र मृत्यूच्या काही तास आधी दिलेल्या जबाबात पतीने अंगावर रॉकेल ओतून जाळल्याचे स्पष्ट केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांचे पथक फरार पतीचा शोध घेत आहेत.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply