अलिबाग : प्रतिनिधी
मोहिते जिमचा प्रतीक मोहिते याने नवोदित रायगड श्री 2019 हा किताब पटकाळाविला. मयेकर जिमचा दिनेश कलमटे बेस्ट पोझर ठरला, तर मेन्स फिजिक्स स्पर्धेत ड्वाईन एनर्जी जिमच्या दिनेश राठोड याने विजेतेपदाला
गवसणी घातली.
रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने चौल येथील मोहिते जिम यांच्या यजामनपदाखाली रेवदंडा येथे रायगड जिल्हा अजिंक्यपद नवोदित रायगड श्री 2019 शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
50, 55, 60, 65 किलो व 70 किलोवरील अशा पाच गटांमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात आली. सुहास पाटील, सुयोग पाटील, राहुल देशमुख, अभिषेक वर्तक, प्रतीक मोहिते यांच्यात किताबासाठी लढत झाली. त्यात प्रतीक मोहिते याने बाजी मारून नवोदित श्री 2019 या किताबावर आपले नाव कोरले. आपल्या शरीरसौष्ठवाचे उत्तम प्रत्येक्षिक सादर करणारा दिनेश कलमटे बेस्ट पोझर ठरला. मेन्स फिजिक्स स्पर्धेत ड्वाईन एनर्जी जिमच्या दिनेश राठोड याने विजेतेपद मिळविले.
रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशचे अध्यक्ष अॅड. किरण कोसमकर, सेक्रेटरी सचिन पाटील व त्यांच्या सहकार्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
RamPrahar – The Panvel Daily Paper