Breaking News

रयत विद्यार्थी इन्स्पायर कॅम्प उत्साहात

उरण : प्रतिनिधी

येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रयत विद्यार्थी इन्स्पायर कॅम्प झाला. या कॅम्पचे उदघाटन डॉ. नंदकिशोर चंदन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक गुण वाढीस लागावेत या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेकडून दरवर्षी हा कॅम्प पाच दिवस आयोजित केला जातो. या कॅम्पमध्ये शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानातील वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले जाते. तसेच विज्ञानावर आधारित कृतीशील अनुभवही दिले जातात. या कॅम्पमध्ये डॉ. राहुल पाटील, डॉ. सुनील जगधनी, डॉ. अमोद ठक्कर, डॉ. स्मिता तांदळे, डॉ. रत्नप्रभा जावळे, डॉ. श्रेया पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॅम्पचे नियोजन विज्ञान प्रमुख प्रा. यु. टी. घोरपडे यांनी केले. या कॅम्पचे प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ. सुनील जगधनी यांनी काम पाहिले. प्रकल्प सहाय्यक म्हणून तु. ह. वाजेकर विद्यालयातील शिक्षिका एस. एस. घोडके यांनी काम पाहिले. कॅम्प यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे, कार्यालयीन अधिक्षिका रत्नप्रभा आहेर व शिक्षकेतर कर्मचारी संदीप केणी व जोशी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply