Breaking News

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवडणूक

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 3) निवडणूक होत आहे. यात शिवसेना नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 59 सदस्यांच्या जिप सभागृहात शेकापचे 23, राष्ट्रवादीचे 11, शिवसेना 18, तर भाजप व काँग्रेसचे तीन सदस्य आहेत. आदिती तटकरे विधानसभेत निवडून गेल्यामुळे अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे. जिपतील सत्तेत सहभागी होण्यावरून सेनेत दोन मतप्रवाह आहेत. सत्तेत सहभागी व्हावे, तसेच ज्या शेकापबरोबर लढाई केली त्यांसह सत्तेत गेल्यास मतदार पुन्हा उभे करणार नाहीत, अशी भीती काहींना वाटते. त्यामुळे सेना नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply