Breaking News

…आणि अलिबागेत अवतरले हुबेहुब नरेंद्र मोदी!

अलिबाग : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश विदेशात दौरे करीत असताना अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी कोणत्याही सुरक्षेशिवाय फेरफटका मारताना आपल्या निवडक सहकार्‍यांसोबत फिरताना पाहायला मिळाले. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे कच्छचे लालजी देवरिया होते. लालजी यांनी मंगळवारी (दि.14)दुसर्‍यांदा अलिबागला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढणे अशक्य असल्याने अनेक नागरिकांनी यावेळी हुबेहूब दिसणारे लालजी यांच्यासोबत फोटो काढण्याची हौस भागवून घेतली. लालजी यांनीही स्थानिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टाईलने फोटो काढले. यावेळी इटीव्ही भारतशी त्यांनी संवाद साधला.

गुजरात कच्छमधील लालजी देवरीया हे हुबेहूब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसतात. त्यामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्ध मिळाली आहे. कुठेही गेले तरी त्यांना नरेंद्र मोदी यांची छबीच समजतात. अलिबागमध्ये लालजी देवरीया हे आले असून ते समुद्र किनारी आणि बाजारात फेरफटका मारत होते. लालजी देवरीया हे प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजनाचे उपाध्यक्ष आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे देवाने मला बनवले याबाबत मी देवाचे आभार मानतो. नरेंद्र मोदी यांच्यावर निघालेल्या नमो सो गंमो या सिनेमात त्यांनी काम केले आहे. तर वेब सिरीजमध्येही काम करीत आहे, असे लालजी देवरीया यांनी इटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. लालजी देवरीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात भाषणही बोलून दाखविले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply