भुवनेश्वर : वृत्तसंस्था
हॉकी प्रो-लीग स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळणार्या भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. जागतिक स्पर्धेत तिसर्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँडला भारताने पहिल्याच सामन्यात 5-2ने हरवले. भारतीय संघाने केलेल्या आक्रमक खेळापुढे नेदरलँडची डाळ शिजू शकली नाही.
पहिल्याच मिनिटाला गुरजंत सिंहने मैदानी गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर ललित उपाध्यायने नेदरलँडच्या पेनल्टी क्षेत्रात सुरेख चाल रचत पेनल्टी कॉर्नर कमावला. भारताचा ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपालनेही या संधीचे सोने करीत 12व्या मिनिटाला चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत भारताची आघाडी 2-1ने वाढवली. नेदरलँडकडून जीप जान्सनने 14व्या मिनिटाला एक गोल नोंदवत यजमान संघाची आघाडी 2-1ने कमी केली.
दुसर्या सत्रात नेदरँलडने चांगले पुनरागमन करीत भारताच्या आघाडीच्या फळीची आक्रमण थोपवली. 28व्या मिनिटाला जेरॉन हर्ट्झब्रेगरने गोल नोंदवत नेदरँडला 2-2 अशी बरोबरी मिळवून दिली. मध्यांतराला भारतीय संघाने रणनिती बदलत पुन्हा एकदा आक्रमणावर भर दिला. 34व्या मिनिटाला मनदीप सिंह आणि 36व्या मिनिटाला ललित उपाध्यायने नेदरलँडची बचावफळी भेदत सुरेख मैदानी गोल झळकावले. यानंतर 46व्या मिनिटाला रुपरिंदरपालने पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल झळकावत भारताची आघाडी 5-2ने वाढवत पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Check Also
Vor die eine Auszahlung denkbar sei, in kraft sein halb wahrscheinlich Umsatzbedingungen
Bares unter anderem Bonusgewinne In welchem ausma? diese Gewinne schenke & amyotrophic lateral sclerosis Bonusgeld …
RamPrahar – The Panvel Daily Paper