Breaking News

‘चांद्रयान-2’ मोहिमेसाठी भारत सज्ज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : भारताचे चांद्रयान-2 व इस्त्रायली बेरेशीट 11 एप्रिल रोजी चंद्रावर दाखल होणार आहेत. चांद्रयान नासाच्या उपकरणाला चंद्रापर्यंत घेऊन जाणार आहे.

भारताच्या चांद्रयान 1 मोहिमेच्या यशानंतर आता भारतीय शास्त्रज्ञांनी चांद्रयान -2 मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. या चांद्रयान मोहिमेमध्ये अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासादेखील सहभागी होत आहे. नासाची चंद्राचे परीक्षण करणारी दोन लेझर उपकरणे भारतीय चांद्रयान व इस्त्रायली बेरेशीट यांच्या माध्यमातून चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. या उपकरणांना लेझर रिफ्लेक्टर्स असे म्हटले जाते.

याबाबत टेक्सस येथे झालेल्या संमेलनात नासाच्या अधिकार्‍यांनी माहिती दिली. नासा व इस्त्रो यांच्या या संयुक्त मोहिमेमुळे पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतर अत्यंत अचूकपणे मोजण्यास मदत मिळणार आहे. भारतीय चांद्रयानाच्या मदतीने चंद्रावर जाणारे हे उपकरण विशिष्ट प्रकारची किरणे पृथ्वीच्या दिशेने प्रक्षेपित करणार आहे. ही किरणे पृथ्वीच्या दिशेने प्रक्षेपित केल्यानंतर संबंधित वेळेची नोंद केली जाणार आहे. या किरणांना जमिनीवर येण्यासाठी किती वेळ लागतो याचे मोजमापन करण्यात येणार आहे. या किरणांचे अवलोकन करण्यासाठी पृथ्वीवर एक विशिष्ट उपकरण बसवण्यास आले आहे. या प्रयोगामुळे पृथ्वीच्या दिशेने आलेल्या या किरणांना किती वेळ लागतो हे कळेल आणि या वेळेनुसार पृथ्वी व चंद्र यामधले अचूक अंतर शोधता येईल, असा दावा नासाच्या संशोधकांनी केला आहे. यापूर्वीही चंद्राचे अचूक अंतर शोधण्याचा प्रयत्न नासाकडून करण्यात आला होता.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply