Breaking News

ध्येयवेड्या तरुणाची संगीत क्षेत्रात झेप

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी परिसरातील शिवनगर मोहोपाडा येथील कौशल विनायक गायकवाड याने एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. मेकॅनिकल इंजिनियरचा डिप्लोमा केलेला हा संगीतप्रेमी लहान वयातच संगीतक्षेत्राकडे वळलेला आहे. त्याने मोहोपाडा प्रिया स्कुलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्याला संगीताची आवड निर्माण झाली होती. कॉलेज जिवनात असतानाच त्याने कविता लिहण्यास सुरुवात केली. कॉलेज संपल्यावर त्याने अ‍ॅलॉप म्युझिक नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाउस https://www.youtube.com/alopmusic तयार केले. वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याची पहीली निर्मिती, पहिले गाणे तुम जिंदगी प्रदर्शित झाले. त्यानंतर दुसरे गीत आय बिलिव हे गाणे प्रदर्शित झाले. आणि आता 24 जानेवारीला त्याची तिसरी रचना मैं तेरा प्रदर्शित झाले आहे. त्याने संदिप देशपांडे यांच्या मराठी नाटकाला सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. शिवनगर येथील कौशलचे गाणे सध्या विविध चित्रपटात, कार्यक्रमात त्याने दिलेल्या म्युझिकवर थिरकत आहेत. त्याचे संगीतक्षेत्रातील यश पाहता कौशलवर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कौशलला त्याचे वडिल विनायक व आई रजनी या दोघांच्या मदतीने तो संगीतक्षेत्रात गरुडझेप घेऊन रसायनीचे नाव देशाच्या नकाशावर नेणार असल्याचे कौशलने बोलताना सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply