खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण सोहळा व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंगळवारी (दि. 4) सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात, समांरभाचे अध्यक्ष जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे सदस्य तथा भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सदस्य तथा पनवेल पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा भाजप प्रवक्ते वाय. टी. देशमुख, संस्थेचे सचिव तथा खारघरच्या रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य एस. टी. गडदे यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमामध्ये नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, प्रविण पाटील, नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, भाजप पनवेल तालुका संघटक प्रभाकर जोशी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, ओवे शहर अध्यक्ष सचिन वास्कर, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, भाजप तालुका चिटणीस जयदास तेलवणे, खारघरच्या रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य शरद शहा यांच्यासह आदी उपस्थित राहणार आहेत. या समारंभाचे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य कैलास कमळाकर म्हात्रे, विद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या समन्वयक स्वप्ना भांडवलकर, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.