Breaking News

सीकेटी’चे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुयश

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : रायगड जिल्हा परिषद अलिबाग-शिक्षण विभागातर्फे हाळ-खोपोली येथील याक पब्लिक हायस्कूलमध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत आयोजित रायगड जिल्हास्तरिय विज्ञान प्रदर्शनात नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सुयश प्राप्त केले आहे.

सीकेटी विद्यालयाने या स्पर्धेत सहभागी होत सामान्यज्ञान स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी-तुकडी चंद्रगुप्त मधील तेजस काळे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी तेजस काळे व मनोज खाकाळ तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख तसेच संस्थेचे कार्यकारिणी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply