Breaking News

‘सोल सेन्सेशन 2.0’ कार्यक्रम उत्साहात

पनवेल ः प्रतिनिधी

 पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथे काकाजीनी वाडीमध्ये आयएनआयएफडीच्या वतीने ‘सोल सेन्सेशन 2.0’ या कार्यक्रमाचे शनिवारी (दि. 4) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक डिझायनर्सनी आपल्या कला सादर केल्या. या कार्यक्रमाला सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सुप्रसिद्ध सिनेकलाकार अली असगर यांची प्रमुख उपस्थिती  लाभली.

आकुर्ली येथील काकाजीनी वाडी येथे पनवेल आयएनआयएफडीच्यावतीने आयोजित ‘सोल सेन्सेशन 2.0 डिझायनर्स पॅराडाईस’ कार्यक्रमात अनेक डिझायनर्सनी आपल्या उत्कृष्ट कला सादर केल्या. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, नगरसेविका राजेश्री वावेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी सभागृह नेेते परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply