पनवेलमधील वाकडी येथील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच नानाशेठ पाटील, शशिकांत खुटले आणि गजानन खुटले यांनी शनिवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश समारंभास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक अनिल भगत, माजी सरपंच नरेश पाटील, सरपंच संदीप पाटील, बबन वाघ, महादेव गडगे, गणेश पाटील, विलास चोरघे, रवी पाटील, हिसाक शेख, बाळू पवार, पद्माकर म्हस्कर, मंगेश पाटील, विश्वनाथ पाटील यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper