पालिका महासभेत 50 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी महासभेत मांडलेल्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. पनवेल महानगरपालिकेची महासभा मंगळवारी (दि. 18) झाली. या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी अंदाजित 50 कोटी रुपयांची विविध विकासकामे मांडली. यामध्ये प्रभाग समिती ’क’ प्रभाग क्र. 14 मधील लायन्स गार्डन ते तहसील कार्यालय ते एचओसी कॉलनीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (10.50 कोटी), प्रभाग समिती’क’ प्रभाग क्र. 14 मधील लायन्स गार्डन ते पनवेल न्यायालय ते पनवेल बंदरपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (10.70 कोटी), प्रभाग समिती’क’ प्रभाग क्र. 14 मधील स्वामी नारायण मंदिर मार्ग (मित्रानंद बिल्डींग अं.भू.क्र. 36/2 ते डॉ. शहा बंगला अं.भू.क्र.29/1)पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे (5.00 कोटी), प्रभाग समिती ’क’ प्रभाग क्र. 14 मधील अं.भू.क्र. 18(पनपा ठाणा नाका पाण्याची टाकी) ते सर्व नं. 797 (गणेश मंदिर ते ला-मेर, प्रेस्टीज गार्डन) साईनगर रस्ता काँक्रिटीकरण करणे (12.00 कोटी), प्रभाग समिती’क’ प्रभाग क्र. 14 मधील सर्वे नं. 746 (पांडे बिल्डींग) ते सर्व नं. 744 (कर्नाळा स्पोर्टस कॉम्प्लेक्स) रस्ता काँक्रिटीकरण करणे (6.50 कोटी), प्रभाग समिती’क’ प्रभाग क्र. 14 मधील आदर्श को.ऑ. हौ. सोसा. लि. व पनवेल को ऑप. हौ. सो. लि.मधील अंतर्गत रस्ते व अं.भू.क्र. 35 ते किनारा सोसायटीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे (5.10 कोटी) अशा एकूण अंदाजित 50 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे.