Breaking News

बोरघाटात अपघात; एक ठार, दोन जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात खालापूर तालुक्यातील ढेकू गावच्या हद्दीत तीव्र वळणावर शनिवारी (दि. 22) पहाटे इन्होवा कारने कंटेनर ट्रेलरला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात एक जण ठार, तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत. आयर्न टूर आणि ट्रॅव्हल्स कंपनीची इनोव्हा कार (एमएच-03, सीपी-4747) शनिवारी द्रुतगती महामार्गावरून सोलापूर येथून मुंबईच्या दिशेने जात होती. बोरघाटात ढेकूगावच्या हद्दीत एका तीव्र वळणावर चालक सतीश च़व्हाण (वय 34, रा. मानखुर्द, मुंबई) याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने पुढे चालणार्‍या कंटेनर ट्रेलरला (एमएच-43, बीजी-0381)पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात मारुती बलभीम कोराडकर (वय 50, रा. बार्शी, जि. सोलापूर) जागीच ठार झाले, तर इन्होवाचालक सतीश चव्हाण व प्रवासी संतोष  सावंत (वय 35, रा. बत्तीसशिराळा, जि. सांगली) हे किरकोळ जखमी झाले. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ गुरुवारी (दि. 20) संध्याकाळी टेम्पो व दोन कारच्या अपघातात चार मुलींसह सहा जण गंभीर जखमी झाले होते. दीप्ती हुंडाळे (15), पूजा सावंत (14), दिक्षा बागडे (15) आणि वर्षा सूर्यवंशी (15) यांच्यासह दोन्ही कारचे चालक जखमी झाल्याने त्यांना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply