पिंपरी : प्रतिनिधी
पुत्रप्राप्ती आणि घरात असलेले गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदूने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला असून, पोलिसांनी या नराधम भोंदूच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सोमनाथ कैलास चव्हाण (वय 32, रा. खैरेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्या भोंदूचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथने पीडित महिलेच्या कुटुंबियांना सांगितले की, तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होऊ नये यासाठी नात्यातील एका बाईने घरातील प्रत्येक सदस्यावर करणी केली आहे. तुमच्या घराच्या एका खोलीत सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असे गुप्तधन आहे. घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे.
पुत्रप्राप्ती व्हावी, गुप्तधन मिळावे आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी घरात तीन उतारे व नग्नपूजा करावी लागेल, असा उपाय भोंदूबाबाने सांगितला, तसेच या पूजेसाठी तीन लाख रुपये खर्च येईल. माझी 11 हजार रुपये दक्षिणा द्यावी लागेल. हे तीन उतारे 15 दिवसात सुरू केले नाहीत, तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या जीवाला मोठा धोका असल्याची भीतीदेखील भोंदूने दाखवली होती. भोंदूने पीडित महिलेच्या कुटुंबीयांकडून पैसे उकळून पीडित महिलेसह तिच्या पाच बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेले. खोलीचे दार बंद करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. सर्व बहिणींना बाहेर जाताना झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना माझ्या दैवी शक्तीने व काळ्या जादूने मारून टाकेन अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेच्या एका बहिणीसोबत उतारा काढण्याच्या बहाण्याने तीन वेळा लैंगिक अत्याचार केला, तसेच पीडितेच्या एका बहिणीचे लग्न झालेले असतानादेखील तिच्याशी पुन्हा लग्न केले.
याबाबत पीडितेने पिंपरी पोलीस धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार भोंदूवर भा. दं. वि. कलम 354, 354 (अ), 376, 376 (1) (अ), 376 (3), 376 (अ ब), 494, 496, पोक्सो, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भोंदू युवकाला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
Check Also
Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?
Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …
RamPrahar – The Panvel Daily Paper