Breaking News

आगीत घर भस्मसात

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील नेराव येथील एका घराला गुरुवारी (दि. 27) रात्री आग लागली. या आगीत हे घर जळून खाक झाल्याने शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर घराची सावली हरपल्याने घरमालकावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.नेराव गावातील तुकाराम कोरपे यांच्या राहत्या घराला गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यात घर जळून खाक झाले. सुदैवाने या वेळी घरात कोणीच नव्हते. महाड पालिकेच्या अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहचले, मात्र तोेपर्यंत घर जळून खाक झाले होते.

Check Also

दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…

एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी …

Leave a Reply