अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील लोणारे गावची शर्विका म्हात्रे भारतातील सर्वांत लहान गडरोहक ठरली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाली आहे. हा सन्मान तिने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केला.
शर्विकाचे वडील जितेन म्हात्रे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी या कार्यालयाकडे शर्विकाचे गड-किल्ल्यावर पायी चढतानाचे व्हिडीओ आणि कागदपत्रे पाठविली होती. ती तपासल्यानंतर शर्विकाला पदक, प्रमाणपत्र देण्यात आले.
शर्विकाचे वडील जितेन आणि आई अमृता गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करतात. त्यांच्याकडूनच शर्विकाला वारसा मिळाला. शर्विका आतापर्यंत 11 किल्ले चढून गेली आहे. 26 जानेवारी रोजी प्रबळगड किल्ल्यावरील चढण्यास कठीण असलेला कलावंतीण बुरूज चढून तिने झेंडा फडकवला होता.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper