भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत कामोठ्यात ‘जनता दरबार’

नागरिकांच्या समस्या सोडविल्या ऑन दी स्पॉट

कामोठे : रामप्रहर वृत्त

येथील सिडको कार्यालयात पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत जनता दरबार मंगळवारी (दि. 3) भरविण्यात आला. या जनता दरबारामध्ये स्थानिक नागरिकांच्या विविध समस्या ऑन दी स्पॉट सोडविल्या गेल्या असून, त्यांचे निराकरण करण्यात आले. हा जनता दरबार होणार असल्याची माहिती मिळताच सिडकोच्या माध्यमातून निविदा काढून कामोठेमध्ये तीन ठिकाणी रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन लोकप्रतिनिधींच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. सिडको वसाहतींमधील  नागरिकांना विविध नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नगरसेवक आपल्या दारी या शिर्षकाखाली उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपच्या नगरसेवकांच्या माध्यमातून सिडको आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जनता दरबारचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारामध्ये सिडको वसाहतीमध्ये राहणार्‍या  नागरिकांच्या अनेक समस्यांचे निराकरण झाले. तसेच नगरसेवकांच्या असलेल्या समस्यांही तत्काळ सोडविण्यात आल्या. हा जनता दरबाराची माहिती सिडको अधिकार्‍यांना मिळताच अनेक महिन्यांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. तसेच महापालिका आणि सिडको वसाहतींमध्ये नागरिकांना भेडसवणार्‍या नागरी समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी प्रत्येक महिन्याच्या 3 तारखेला अशाच प्रकाराचा जनता दरबार महापालिका हद्दीत भरविण्यात येणार आहे. या जनता दरबारावेळी सिडकोचे अधीक्षक अभियंता शिताराम रोखडे, सहाय्यक अभियंता मापेरा, बनकर, कोलपकर, नवेल, महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर, प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, गोपीनाथ भगत, नगरसेविका विद्या गायकवाड, लिना गरड, हेमलता म्हात्रे, कुसूम गणेश पाटील, हेमलता गोवारी, मोनिका मानवर, संतोषी तुपे, शिला भगत, नगरसेवक दिलीप पाटील, अरुण कुमार भगत, सतोष शेट्टी, विकास घरत, युवा नेते हॅपी सिंग, रमेश म्हात्रे, भाऊ भगत यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply