Breaking News

भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसाचा विजय

धरमशाला : वृत्तसंस्था
भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 12)धरमशाला येथे होणार होता, मात्र सतत पडणार्‍या पावसामुळे अखेर एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द करण्यात आला.
धरमशाला येथे दुपारी 1.30 वाजता सामना सुरू होणार होता, पण पाऊस आणि ओली खेळपट्टी यामुळे सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही. आधी ओली खेळपट्टी आणि 2.30 नंतर पाऊस अशा दुहेरी कारणामुळे अखेर 5.30च्या सुमारास सामना रद्द करण्याचा निर्णय सामनाधिकार्‍यांनी घेतला.
गेल्या वर्षा याच मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.

Check Also

चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व

आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी …

Leave a Reply